
एका शाळेत एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. शाळेच्या वर्गात शिक्षिका एकटी असताना डीन वर्गात आला आणि त्याने त्यांना मागून पकडत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. ही घटना वाराणसीमधील सिग्रा पोलीस स्टेशन परिसरातील डालमियास सनबीम स्कूलमध्ये घडली. विशेष म्हणजे पीडित शिक्षिकेलाच शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
याप्रकरणी पीडित शिक्षिकेने बुधवारी सिग्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवलीय. पोलिसांनी सांगितले की, शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी डीन सुबोधदीप डेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी डीन अजूनही फरार आहे.
सोनिया परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, त्या 2019 पासून डाल्मियास सनबीम शाळेत शिक्षिका आहेत. 27 मे रोजी सकाळी 11 वाजता काही महत्त्वाच्या कामासाठी त्या पतीला फोन करण्यासाठी शाळेतील एका खोलीत गेल्या. त्यावेळी अचानक डीन खोलीत गेला त्यावेळी त्याने शिक्षिकेला मागून पकडलं.
त्यावेळी त्यांनी त्याचा हात झटकत विरोध केला. मग त्यानंतर त्याने शिक्षिकेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मग शिक्षिकेचा फोन हिसकावून घेतला. तुला , 'रोज मी एकटीला भेटायला फोन करतो पण तू येत नाहीस, आता जर तुला मोबाईल हवा असेल तर, रात्री शांतपणे फ्लॅटमध्ये एकटीच मला भेटायला ये, असे म्हणत डीन तेथून निघून गेला. त्यानंतर घाबरलेल्या शिक्षिकेनं मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. परंतु मुख्याध्यपकांनी पीडित शिक्षिकेलाच शाळेत काढून टाकलं.
लैंगिक शोषणाचा बळी पडलेल्या महिलेचा दावा केला की, शाळेच्या आवारात डीनने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. शाळेत बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. पण शाळा व्यवस्थापन त्यावेळचे फुटेज डिलीट करू शकते, अशी भीती असल्याचं शिक्षिका म्हणाल्या आहेत. डीन शाळेत काम करणाऱ्या इतर महिला शिक्षिकांवरही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतात. पीडित महिला शिक्षिका जेव्हा रोडवेज पोस्टवर तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचली तेव्हा डीन आणि त्यांचे साथीदारांनी तिला धमकी दिली, असा आरोप केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.