Latur City Bus Service Stopped Saam tv
महाराष्ट्र

Latur City Bus Service: लातूरची शहर बससेवा आठ दिवसांपासून बंद; महापालिकेकडे बिल थकल्याने निर्णय

Latur's City Bus Service Shutted: लातूर शहरात महापालिकेकडून सप्टेंबर २०२२ पासून शहर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याकरिता महापालिकेने खाजगी एजन्सीशी करार करून शहर बस चालविली जात आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले

Latur Bus Service Stopped

लातूर शहर महापालिकेच्या अंतर्गत असलेली परिवहन सेवा मागीत आठ दिवसांपासून बंद झाली आहे. परिवहन (Latur) सेवा देणाऱ्या एजन्सीला मागील वर्षभरापासून बिल मिळालेले नाही. यामुळे सदरचे थकीत बिल मिळावे या मागणीसाठी एजन्सीने हा निर्णय घेतला आहे. शहर बससेवा बंद असल्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. (Maharashtra News)

लातूर शहरात महापालिकेकडून सप्टेंबर २०२२ पासून शहर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याकरिता महापालिकेने खाजगी एजन्सीशी करार करून शहर बस (Bus Service) चालविली जात आहे. या शहर बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. यामुळे दिवसभरात २१ बसच्या माध्यमातून दररोज दोनशे ते अडीचशे फेऱ्या शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर होतात. परंतु ही सेवा थांबल्याने प्रामुख्याने महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरापासून महापालिकेकडे बिल थकीत

शहर बस सेवा सुरु करताना महापालिकेने एजन्सीशी करार करत महिलांना सिटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली. याचे भाडे महापालिका संबंधित एजन्सीला देणार. त्यानुसार जानेवारी २०२३ पासून महिलांना मोफत प्रवास देण्याची अंलबजावणी सुरु झाली. मात्र मागील १५ महिन्यांपासून महापालिकेने महिलांच्या प्रवासाचे बिल एजन्सीला अद्याप दिलेले नाही. हि रक्कम २ कोटींच्या वर गेली आहे. याकरिता एजन्सीने महापालिकेला पत्र देखील दिले आहेत. तरी देखील बिल अदा करण्यात आले नसल्याने मागील आठ दिवसांपासून एजन्सीने बससेवा थांबविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT