Latur Accident Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident : भरधाव कार थेट हॉटेलात घुसली; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

Latur News : लातूर- बार्शी महामार्गावरील मुरुड येथे हा भीषण अपघात झाला आहे. महामार्गालगतच लहान- मोठे हॉटेल लावण्यात आलेले आहेत. यामुळे मार्गावरून येणारे जाणारे बरेच जण नास्ता किंवा चहा पिण्यासाठी थांबतात

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूर- बार्शी महामार्गावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महामार्गाने भरधाव वेगाने जाणारी स्कार्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली आहे. या अपघातात हॉटेलमध्ये बसलेले पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यात एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा अपघात पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. 

लातूर- बार्शी महामार्गावरील मुरुड येथे हा भीषण अपघात झाला आहे. महामार्गालगतच लहान- मोठे हॉटेल लावण्यात आलेले आहेत. यामुळे मार्गावरून येणारे जाणारे बरेच जण नास्ता किंवा चहा पिण्यासाठी थांबत असतात. अशाच प्रकारे दुपारच्या वेळी काहीजण हॉटेलमध्ये बसलेले होते. याच वेळी सुसाट वेगाने आलेली स्कॉर्पियो कार हॉटेलमध्ये घुसून खुर्च्या- टेबल आणि हॉटेलमध्ये बसलेल्यांना उडवत गेली. 

एकाचा मृत्यू, सहा जण जखमी 
लातूर बार्शी महामार्गावरच्या मुरुड येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगत असणारी स्कार्पिओ थेट हॉटेलमध्ये घुसल्याची धक्कादाय घटना घडली. दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

अहिल्यानगर पुणे महामार्गावर डिझेल टँकर उलटला 
अहिल्यानगर
: अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील चास जवळील धोकादायक वळणावर अंदाज न आल्याने भरधाव वेगाने जाणारे डिझेलचे टँकर पलटी झाले. यामुळे टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडवले आहे. तर टँकर पलटल्यानंतर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. या अपघातामुळे नगर पुणे रोडवर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत डिझेल टँकरवर उडवले साबण मिश्रित पाण्याचा मारा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT