Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; ४ वर्षीय मुलीचा मृत्यू, आईचा मन हेलावणारा आक्रोश

Latur News : गावातील लहान गल्ली असलेल्या रस्त्यांवरून मातीने भरलेले ट्रॅक्टर नेले जात आहेत. घराच्या बाहेर अंगणातील रस्त्यावर शिवकन्या खेळत होती. मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने मुलीचा मृत्यू

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: गावातून मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याची घटना घडली आहे. या थरारक घटनेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील अवलकोंडा या गावात आज सकाळच्या सुमारास घडली आहे. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या आईने मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. 

लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा या गावातील शिवकन्या खेळकर (वय ४) असे अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान गावाच्या शिवरावातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती वाहतुकीचे काम सुरु आहे. गावातील लहान गल्ली असलेल्या रस्त्यांवरून मातीने भरलेले ट्रॅक्टर नेले जात आहेत. याच वेळी घराच्या बाहेर अंगणातील रस्त्यावर शिवकन्या खेळत होती. याचवेळी मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने या मुलीचा मृत्यू झाला. 

ट्रॅक्टर चालक फरार 

गावात वस्तीमध्ये ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचा चिरडून जागीच दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक गौस बागवान हा फरार झाला असून आहे. चालकाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळताच तिच्या आईने मन हेलावणारा आक्रोश केला. 

भरधाव कंटेनर थेट दुकानात घुसला 
पुणे
: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात घुसला. या दुर्घटनेत कंटेनरचा चालक व वाहक दोघेही जखमी झाले आहेत. अपघात रात्री घडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, दुकान तसेच तेथे उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व क्रेनच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT