Nana Patole SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर कसली; मुंबईत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

Congress : काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Lok Sabha elections: आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत विरोधकांना हाणून पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अशात आता काँग्रेसमध्ये देखील आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. २ आणि ३ जून रोजी मुंबईत काँग्रेसची मोठी बैठक पार पडणार आहे. (Latets Political News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीसाठी काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

२ आणि ३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातही काँग्रेस चाचपणी करणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची बैठक होत आहे.

सदर बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, आमदार, प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा

Sanjay Raut : "संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला..." संजय राऊतांचा भाजपावर ऐन दिवाळीत जळजळीत टीका

Health Tips : गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही? वाचा तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT