devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: 'महाराष्ट्राचा महाचाणक्य'; राजकीय भूकंपानंतर देवेंद्र फडणवीसांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स

कालच्या राजकीय भुकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही नवी उपाधी देण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Nagpur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता एक वर्षाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असून अजित पवार शिंदे- भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. रविवारी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची वेगळीच चर्चा सुरु असून त्यांना नवी राजकीय उपाधी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांना वेगळी राजकीय उपाधी दिलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. 'महाराष्ट्राचा महाचाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज नागपूरमध्ये लावण्यात आले आहेत. कालच्या राजकीय भुकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही नवी राजकीय उपाधी देण्यात आली आहे.

भाजपचे (BJP) नेते आणि बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हे बॅनर लावले आहे. यावर ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला आहे. फडणवीसांच्या शेजारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. होर्डिंग्जवर कमळ, घड्याळ आणि धणुष्यबाण अशा तिन्ही पक्षांचे चिन्ह एकत्र लावण्यात आलेत.

"महाराष्ट्राच्या हितासाठी वर्षभरात दोन पक्ष भाजपसोबत, "देवेंद्र फडणवीस तुमच्या चाणक्यनितीला मानाचा मुजरा..!" असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rabies Awareness: कोणकोणते प्राणी चावल्याने रेबीज होऊ शकतो?

Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

India Asia Cup 2025 Winner : भारताचा विजय 'तिलक'! पाकिस्तानचे वस्त्रहरण; २१ दिवसांत तिसऱ्यांदा पराभवाची चव चाखवली

BMC Election: मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीला यश मिळणार की ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार?

IND Vs PAK Final : ए चल... भारताला चौथा धक्का बसला अन् अबरार अहमदनं पुन्हा केलं वादग्रस्त सेलिब्रेशन, Video

SCROLL FOR NEXT