Navi Mumbai Lottery 2023: प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे हक्काचं घर असावं याचं स्वप्न पाहत असतो. अशात नवी मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिडको लवकरच ५००० घरांसाठी लॉटरी काढणार आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालन पदावर अनिल डिग्गीकर आहेत. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लगेचच सोडत निघणार आहे. (Latest CIDCO Lottery 2023)
सध्या सिडकोची तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. सिडको खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात घरे बांधत आहे. ३१ मे रोजी यंदाची लॉटरी निघणार होती. मात्र तेव्हाच सिडकोचे एमडी डॉ. मुखर्जीं यांची बदली झाली आणि डिग्गीकर एमडी झालेत. त्यामुळे त्यांनी लॉटरीचा प्रस्ताव मान्य केल्यास लगेचच लॉटरी निघणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार या तत्वाने ही लॉटरी निघणार आहे.
सर्वसामान्य व्यक्तींचे मुंबईत घर (Home) घेण्याचे स्वप्न महाडा आणि सिडकोमार्फत (CIDCO) पूर्ण होते. अनेक व्यक्ती यंदाच्या लॉटरीची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात सिडकोच्या घरांच्या किंमती काही प्रमाणात जास्त आहेत. ही किंमत काहींच्या खिशाला परवडणारी नसल्याने नागरिक याकडे पाठ फिरवतानाही दिसत आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या अनेक घरांची विक्री शिल्लक आहे.
एकाच वेळी ५००० घरांची सोडत काढून सर्व घरांची विक्री करण्याचे नियोजन प्राधिकरणाने आखले आहे. सदर लॉटरीमध्ये (Lottery) प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. सध्याची सोडत तळोजा नोडमधील घरांसाठी आहे. त्यानंतर निघणारी सोडत ही नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली येथील असणार आहे. सध्या या शहरांमध्येही घरांचे बांधकाम सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.