Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Kalyan News : ठाण्याच्या हद्दीत परवाना असलेले अग्नीशस्त्र धारकांची संख्या १ हजार ३६७ आहे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण : कल्याण डाेंबिवली हद्दीतील आठ पोलिस ठाण्यात रेकोर्डवरील ४० गुंडाच्या विरोधात तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हि कारवाई केली असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

पोलिसांच्या नाकाबंदी कारवाईत १ हजार ४२ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दारुबंदी कायद्यान्वये ११६ जणांच्या विरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून ३२ लाख ११ हजार ३९८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणाऱ्या ७६ जणांच्या विरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून २ लाख ११ हजार १० रुपये रक्कम जप्त केली आहे.

कल्याण पोलिस परिमंडळाच्या अंतर्गत महात्मा फुले पोलिस, खडकपाडा, बाजारपेठ, टिळकनगर, विष्णू नगर, मानपाडा, रामनगर या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या पाेलिस ठाण्याच्या हद्दीत परवाना असलेले अग्नीशस्त्र धारकांची संख्या १ हजार ३६७ आहे. त्यापैकी १ हजार १९२ जणांची अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Kalyan News
Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

अंमली पदार्थ प्रकरणात ८ जणांच्या विरोधात कारवाई करुन ६ लाख ७ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सात जणांच्या विरोधात गुटखा बंदीची कारवाई करुन त्यांच्याकडून ३० लाख ४७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

बाजारपेठ, विष्णूनगर आणि खडकपाडा या तीन पोलिसा ठाण्याच्या हद्दीतून ७९ लाख ३० हजार २०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांना विविध गुन्हे प्रकरणात पाहिजे असलेल्या १२१७ आरोपींपैकी सहा जणांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात फरार असलेल्या २८९ आरोपींपैकी ९ जणांना अटक केली आहे. विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८१ रूट मार्च काढण्यात आले असल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

Kalyan News
Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

आज ठाणे पाेलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कल्याण पोलिस परिमंडळाच्या विधानसभा निवडणूकीसंदर्भातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. या प्रसंगी अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्यासह विविध पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक उपस्थित होते.

आयुक्त डुंबरे यांनी कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या मतदार संघात निवडणूकीत मतदान निर्भयपणे व्हावे; यासाठी पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतली आहे. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याचे डुंबरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com