Crime News: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांकडून आळीपाळीने अत्याचार; छत्रपती संभाजीनगर शहरातील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime NewsSaam TV
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. या प्रकरणी सातारा परिसर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी सध्या नववीच्या वर्गात शिकते. 2022 मध्ये ती अक्षय नामक तरुणाच्या संपर्कात आली. मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांचे नियमित व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरु झाले. मात्र, या तरुणाने त्यानंतर तिला भेटण्यासाठी हट्ट सुरु केला. त्याने विश्वास जिंकत तिला भेटण्यासाठी गळ घातली.

त्यानंतर पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे चोरुन मोबाईलमध्ये चित्रणदेखील केले. पुढे हाच व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच आपल्या मित्रांना देखील मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली.

दरम्यान, मित्राकडून सुरु झालेल्या अत्याचाराबाबत कोणाला सांगायचे, असा प्रश्न पीडित मुलीला पडला. यातच तिला पुन्हा एका मित्राने तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे ठरवत सोबत पळून जाण्याचे आश्वासन दिले. तणावाखाली गेलेल्या मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला.

त्याच्या सांगण्यावरुन १८ मे रोजी तिने घरातील २० हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले.

दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक सुद्धा केली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com