Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद
पाच वर्षे महाराष्ट्राचा जो तमाशा पाहिलात, या चिखलातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. मनसेच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. 20 तारीख महत्वाची असून गाफील राहू नका. मतभेद असतील तर ते गाडा तुमच्या मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे, अशी भावनिक साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना घातलीय. कल्याण येथील मनसेचे उमेदवाराच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत जास्त काही न बोलता त्यांनी मतदारांना आवाहन केलंय. राज ठाकरे यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी थोडावेळ कार्यकर्त्यांशी संबोधित केलं. यामुळे त्यांनी मतदारांना आवाहन केलं त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या समस्यांवर कोणी बोलत नसल्याची नाराजी व्यक्त केली. मुलाखतकारांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष नसतं,फक्त कोंबडी झुंजवत असतात.
काय म्हणाले राज ठाकरे
20 तारीख महत्वाची आहे गाफील राहू नका. मतभेद असतील तर ते गाडा तुमच्या मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे. आज माझी तब्येत बरी नसल्याने जास्त वेळ बोलणार नाही. आज मी तुमचा भ्रमनिरास करणार आहे तब्येत नाजूक आहे. कार्यकर्त्यांना भेटायला येईन असे सांगितले होते , पण त्यांनी सभाच लावून टाकली. मात्र 23 तारखेला उल्हासला विजयी करा मी विजयी मिरवणुकीत येणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.