Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

ICC Champions Trophy: बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिल्याचं खरं कारण काय?
Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण
chmpions trophyyandex
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धा जरी पाकिस्तानात असली तरी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहत याबाबत खुलासा केला आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात का जाणार नाहीये?

स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सुरक्षेला अधिक महत्व दिलं आहे. या पत्रात आंतकवादी हल्ल्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मते, पाकिस्तानची सामान्य जनता भारतीय संघाचं जोरदार स्वागत करेल.

मात्र त्यांच्यावर आंतकवादी हल्ल्यांची भिती आहे. यापूर्वी २००९ मध्ये श्रीलंकेवरही हल्ला करण्यात आला होता. या वृत्तात, गेल्या १ वर्षात करण्यात आलेल्या अनेक हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण
IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

हेच कारण आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. भारतीय संघाने २००६ मध्ये पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला, पण भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही.

बीसीसीआयने पत्र पाठवल्यानंतर पीसीबीनेही प्रत्युत्तर दिलंय. पीसीबीने स्पष्ट म्हटलंय की, भारतीय संघाला जर पाकिस्तानात यायचं नसेल, तरीदेखील हायब्रिड मॉडेलमध्ये स्पर्धेचे आयोजन होणार नाही. संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच होणार

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण
IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

आयसीसीसमोर काय आहेत पर्याय?

आयसीसीसमोर ३ पर्याय असणार आहेत. पहिला पर्याय म्हणजे, पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेऊन दुसऱ्या देशाकडे देणे. दुसरा पर्याय म्हणजे, स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करण्यात यावे. तिसरा पर्याय म्हणजे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करणे. यामुळे आयसीसी आणि पीसीबी, दोघांचही आर्थिक नुकसान होणार आहे. कारण या स्पर्धेमुळे दोघांनाही मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com