ICC Champions Trophy 2025 News In Marathi: आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची घोषणा केल्यापासून एक विषय तुफान चर्चेत आहे, तो म्हणजे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार क? बीसीसीआय आधीपासूनच पाकिस्तान जाऊन खेळण्याच्या विरोधात आहे.
आता बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं होणार का? आणि झालं तर कसं होणार?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पीटीआयच्या एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ' ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि बीसीसीआयने आयसीसीला सांगितलंय की, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. आता आयसीसीने यजमान देशाला सांगावं आणि स्पर्धेचं वेळापत्रक ठरवावं. तसं पाहायला गेलं तर, आयसीसीच्या स्पर्धेचं वेळापत्रक हे १०० दिवसांपूर्वी जाहीर केलं जातं.
या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि पाकिस्तानला जर ही स्पर्धा आयोजित करायची असेल, तर एकाच पर्याय उरतो, तो म्हणजे हायब्रिड मॉडेलचा. कारण बीसीसीआयने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार कळवला आहे.
एकीकडे भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यास तयार नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानला हायब्रिड मॉडेल नकोय. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेलच्या विरोधात आहे. मात्र आयसीसी भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यासाठी फोर्स करू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारतासमोर झुकावंच लागेल.
भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यासाठी नकार देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.