IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावासाठी १८७५ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. या यादीत देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
यासह कसोटीतून निवृत्त झालेल्या जेम्स अँडरसननेही लिलावासाठी नाव नोंदवलं आहे. जेम्स अँडरसन गेल्या १० वर्षांपासून एकही टी -२० सामना खेळलेला नाही. मात्र तरीही त्याने लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.
तर दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या लिलावासाठी नाव नोंदवलेलं नाही. आता त्याला पुढील २ वर्ष तरी आयपीएल खेळता येणार नाही. काय आहे आयपीएलचा नवा नियम? जाणून घ्या.
बेन स्टोक्स हा आयपीएल स्पर्धेतील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाडूने राजस्थान रॉयल्स, पुणे सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र आता आयपीएलच्या नव्या नियमामुळे तो अडचणीत येऊ शकतो.
हा नवा नियम ऑक्शनआधीच लागू करण्यात आला होता. नव्या नियमानुसार, खेळाडूंना मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदणी करणं बंधनकारक आहे. जर एखाद्या खेळाडूने मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवलं नसेल, तर तो पुढील २ वर्ष मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
या नव्या नियमानुसार, बेन स्टोक्सने या ऑक्शनसाठी नाव नोंदवलेलं नाही, त्यामुळे तो २०२६ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी देखील नाव नोंदवू शकणार नाही. या नियमातील आणखी एक ट्विस्ट म्हणजे, जर एखाद्या खेळाडूने ऑक्शनसाठी नाव नोंदवलं, त्याची संघात निवड झाली आणि मग त्याने स्पर्धेतून माघार घेतली तर त्याला पुढील २ वर्ष आयपीएल खेळता येणार नाही. आता बेन स्टोक्सही या नियमाच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
बेन स्टोक्स पुन्हा आयपीएल खेळू शकतो. मात्र त्याला २ वर्ष या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. आयपीएल २०२७ स्पर्धेत तो खेळू शकतो. पण कुठला संघ त्याच्यावर बोली लावणार हे पाहणं महत्वाचं आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.