pandharpur, Kamla Ekadashi 2023, devotess, adhik mahina saam tv
महाराष्ट्र

Kamla Ekadashi 2023 : विठू नामाच्या गजराने पंढरी दुमदुमली, अडीच लाख भाविक दाखल; दर्शनासाठी लागताेय आठ तासांचा वेळ (पाहा व्हिडिओ)

adhik mahina : भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून 14 ऑगस्टपर्यंत विठूरायाची पाद्य पूजा बंद आहे.

भारत नागणे

Pandharpur News : अधिक मासातील (adhik mahina) आज कमला एकादशीची (kamla ekadashi 2023) आहे. एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महासागर लोटला आहे. जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविका आज (शनिवार) पंढरीत दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

आषाढी एकादशी निमित्त देश-विदेशातून लाखाे भाविक पंढरपूरला येत असतात. याच प्रमाणे यंदा अधिक मास आल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी माेठ्या संख्येने भाविक पंढरीत येऊ लागले आहेत. या भाविकांची काेणत्याही प्रकारची अडचण हाेऊ नये यासाठी मंदिर प्रशासन काळजी घेत आहे.

अधिक मासातील आज कमला एकादशीची आहे. एकादशीच्या निमित्ताने पंढरीत (pandharpur) भक्तीचा महासागर लोटला आहे. जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविका आज पंढरीत दाखल झाले आहेत.

एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि विठुरायाचे दर्शन या काळामध्ये पवित्र मानलं जातं त्यामुळे आज पंढरीत मोठी गर्दी झाली आहे.

विठ्ठल मंदिरापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर दर्शनाची रांग गेली आहे. दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा वेळ लागत आहे. पंढरीतील विविध मठ धर्मशाळांमध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे. अवघी पंढरी नगरी आज विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT