Milk Price : ...अन्यथा शहरांना जाणारे दूध राेखणार : 'स्वाभिमानी'चा सरकारला इशारा; शेतक-यांनी राेखला नगर- मनमान महामार्ग

Nagar Manmad Highway : आंदाेलकांनी सरकारचा निषेध करत जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना दुधाचा अभिषेक घातला.
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari Sanghatanasaam tv
Published On

Nagar News : सरकारने फसवी दुध दरवाढ केल्या असल्याचा आराेप करीत आज (शुक्रवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतक-यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडलं आहे. यामुळे गेले एक तास झाले या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. (Maharashtra News)

Swabhimani Shetkari Sanghatana
Parbhani DCC Bank : 2 कोटींचा अपहार; परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 73 कर्मचारी धास्तावले?

राज्य सरकारने दुधाला किमान 34 रुपये दर (milk price) देण्याची केलेली घोषणा हवेतच विरली आहे. प्रत्यक्षात दुध संघांकडून दूध उत्पादकांची आर्थिक लूट होत असून या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

Swabhimani Shetkari Sanghatana
Ratnagiri Rain Updates : तोणदे गावात पाणी शिरलं, मगरींच्या भीतीने युवकाने काढली रात्र झाडावर (पाहा व्हिडीओ)

राज्यातील दुध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारने किमान 34 रूपये दर देण्याचा आदेश जारी केला. मात्र सरकारच्या आदेशाला दुध संघांनी केराची टोपली दाखवली असून शेतक-यांना प्रत्यक्षात 28 ते 30 रूपये दुधाला भाव दिला जा आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
Lonavala Tata Dam News : पावसाळी पर्यटन... लोणावळ्यात पावसाची मज्जा काही औरच, टाटा धरण 90 टक्के भरले

त्यामुळे या विरोधात आज (शुक्रवार) राहुरी बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको केला. सरकारने केलेली घोषणा फसवी असून जर आठ दिवसांत यावर ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यासोबतच शहरांकडे जाणारे दूध बंद करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी सरकारचा निषेध करत जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी रस्त्यावरच स्वतःला दुधाचा अभिषेक घालत राज्य सरकारचा निषेध केला.

Swabhimani Shetkari Sanghatana
Thane Rain News : मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन, नागरिकांच्या धैर्यामुळे माेठा अनर्थ टळला; 50 कुटुंबांचे स्थलांतर (पाहा व्हिडिओ)

प्रमुख मागण्या

१) दुधाच्या ३:२ या गुणप्रतीस ३४ रुपये भाव मिळावा.

२) एसएनएफचा २० पैसे तर फँटचा ३० पैसे दर निश्चित करावा.

३) तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतक-यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान द्यावे

४) पशुधनाला मोफत विमा सरंक्षण मिळावे

५) डबल टोन्ड दुधावर बंदी आणावी.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com