Thane Rain News : मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन, नागरिकांच्या धैर्यामुळे माेठा अनर्थ टळला; 50 कुटुंबांचे स्थलांतर (पाहा व्हिडिओ)

Mumbra Landslide News : मुंब्रातील घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
landslide hits residential area in mumbra bypass near thane
landslide hits residential area in mumbra bypass near thanesaam tv

Mumbra News : मुंब्र्यात भूस्खलन झाल्याने चार घरांची पडझड झाली. सुदैवाने या घटनेत काेणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ डोंगरावरील 50 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. (Maharashtra News)

landslide hits residential area in mumbra bypass near thane
Maharashtra Electricity Rate: अन्य राज्यांत वीजदर कमी, महाराष्ट्रातील वाढीव वीजदराची चाैकशी करा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवी जवळ डोंगरावर असलेल्या कैलासगिरी नगर येथे भूस्खलन झाले. या घटनेत 4 ते 5 घरांची पडझड झाली. सतत पडणा-या पावसामुळे या डाेंगरानजीकची भूसभूशीत मातीमुळे भूस्खलन झाल्याची चर्चा हाेती.

landslide hits residential area in mumbra bypass near thane
Pregnant Women Story : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले नदीतून खांद्यावर; हे पाहून शिंदे फडणवीस सरकारला पाझर फुटणार का? (पाहा व्हिडिओ)

या घटनेने घाबरलेल्या स्थानिकांनी तात्काळ घर सोडून इतर ठिकाणी आसरा घेतल्याने त्यांचा जीव वाचला असेही घटनास्थळावरुन सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

landslide hits residential area in mumbra bypass near thane
Navi Mumbai News : काेंडी सुटली... दिघे की दिघा रेल्वे स्थानक ? जाणून घ्या नवे नामकरण

धुवांधार पाऊस (rain) आणि रेड एलर्टच्या पार्श्वभूमीवर भूस्खलन झालेल्या परिसरातून प्रशासनाने जवळपास 40 ते 50 कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ स्थलांतरीत केले. अनेकांनी परिसरातील मशिदीत तर काही जणांनी आपल्या नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. उर्वरित स्थानिकांची व्यवस्था शाळांमध्ये करण्यात आली आहे.

मनीष जोशी (उपायुक्त, ठाणे महापालिका) यांनी साम टीव्हीशी बाेलताना या घटनेत (landslides) सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही तसेच कुठलीही दुखापत काेणालाही झालेली नाही असे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com