- सिद्धेश म्हात्रे
ट्रान्सहार्बर मार्गावरील नव्या रेल्वे स्थानकाच्या नावाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. ऐरोली ते ठाणे सेक्शन दरम्यान वाढत आलेल्या नव्या रेल्वे स्थानकाचे नाव दिेघे नव्हे तर दिघा असेच राहणार आहे. (Maharashtra News)
नवी मुंबईतील (navi mumbai) ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले. त्याच नावाची कमान रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आली. दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आल्याने स्थानिकांसह राजकीय क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली. त्यातूनच राजकीय वाद सुरु झाला. या नव्या वादावर कसा पडदा पडताे याची उत्सुकता नागरिकांना देखील लागून राहिली हाेती.
दरम्यान नागरिकांच्या (villagers) मागणीनुसार आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या रेल्वे स्थानकाचे नाव दिघा असे देण्यात येणार आहे. नामांतरणाची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती माजी खासदार संजीव नाईक (former mp sanjeev naik) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील नव्या रेल्वे स्थानकाच्या (railway) नावाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.