Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील ३०,९१८ लाडक्या बहिणींचा लाभ बंद; ₹१५०० पुन्हा मिळवण्यासाठी हे काम कराच

Wardha Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत ई केवायसीमध्ये झालेल्या चुकीमुळे हजारो महिलांचे लाभ बंद केले आहेत. दरम्यान, आता या महिलांना लाभ पुन्हा सुरु करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत अपडेट

केवायसीमुळे अनेक महिलांचा लाभ बंद

या महिलांना अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. केवायसी करुनही महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये. यामुळे महिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे. त्यांना अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायला सांगितले आहे.

वर्धा जिल्ह्यातील ३०,९१८ महिलांचा लाभ (Ladki Bahin Y)

वर्धा जिल्ह्यातील ई केवायसीमुळे जवळपास ३०,९१८ महिलांचा लाभ बंद झाला आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत ईकेवायसी मुळे लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असं सांगण्यात आले आहे.

शासन स्तरावरून यादी प्राप्त झाली आहे. यामध्ये ३०,९१८ लाभार्थ्यांमध्ये २२९२१ ग्रामीण भागातील तर ७९९७ महिला शहरी भागातील आहेत.लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अंगणवाडी सेविकांकडे अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स आणी स्वयंमघोषणापत्र देण्याचे आवाहन महिलांना करण्यात आले आहे. 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ई केवायसीत अनेकांनी चुकीची माहिती भरल्याने व योग्य पद्धतीने न भरल्याने लाडक्या बहिणीचे अनुदान बंद झाले आहे.बंद झालेल्या लाभार्थ्यांच्या मागणी नंतर शासनाचा फेर ई केवायसीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडे महत्त्वाची कागदपत्र देण्यास सांगितले आहे. अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष पडताळणी करण्यास सांगितले आहे. या पडताळणीत ज्या महिला निकषात बसतील त्यांचा लाभ सुरु केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Mumbai Thane : मुंबई-ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट! ७५ मिनिटांचा प्रवास फक्त २५ मिनिटात; पाहा काय आहे नवा मास्टर प्लॅन

Sweet Ayate Recipe : विदर्भ स्पेशल नाश्ता; 'असे' करा मऊ-लुसलुशीत गोड आयते, तोंडात टाकताच विरघळतील

Disha Patani : दिशा पाटनीने दिली प्रेमाची कबुली? इव्हेंटमध्ये तलविंदर सिंहचा हात धरून फिरताना दिसली, पाहा VIDEO

Surya Grahan 2026: या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण; पाहा कोणावर पडणार याचा अधिक प्रभाव

SCROLL FOR NEXT