मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्यास मिळणार आहे. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा शब्द महायुतीने दिला होता. हा शब्द सरकार पाळणार असून योग्य वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरीतील वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. यावेळी महिलांशी संवाद साधत असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. मंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला की, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आम्ही योग्य वेळी देणार आहोत. विधानसभेला दिलेला १५०० रुपयांचे २१०० रुपये करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहोत. योग्य वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील.
मंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल सांगितले की, 'लाडकी बहीण योजना 100 टक्के सुरू राहणार आहे. ही योजना कुणीही बंद करू शकत नाही. महिलांच्या आरोग्यासाठी हक्काचे पैसे हवेत यासाठी लाडकी बहीण योजना आहे. महिलांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे.'
दरम्यान, लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये कधी होणार याकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. उदय सामंत यांनी २१०० रुपये देण्याबाबत आश्वासन दिले असले तरी ही वाढ नेमकी कोणत्या महिन्यापासून लागू होणार याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे ३००० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी दिले जाणार याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.