Famous Actor Death : हरहुन्नरी कलाकार गमावला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actor Passes Away : कॉमेडियन, अभिनेत्याचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कारकि‍र्दीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Actor Passes Away
Famous Actor DeathSAAM TV
Published On: 

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आयर्लंडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते पीजे गॅलाघर (PJ Gallagher) यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. आपल्या विनोदी शैलीने आणि खास सादरीकरणाने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेते पीजे गॅलाघर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले आहे. पीजे गॅलाघर हे डब्लिनच्या उत्तर भागातील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. पीजे गॅलाघर यांच्या निधनाची अधिकृत माहिती त्यांच्या मॅनेजमेंट एजन्सीने दिलेल्या निवेदनातून जाहीर केली. या निवेदनात त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनीही या कठीण काळात खासगीपणाचा आदर करण्याची विनंती चाहत्यांना आणि नागरिकांना केली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

निवेदनात नेमकं काय?

अभिनेत्याच्या निधनाची बातमी त्यांच्या व्यवस्थापन संस्थेने 'द आयरिश सन'ने एका अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनात म्हटले आहे, "अत्यंत दुःखासह आम्ही पी.जे. गॅलाघर यांच्या निधनाची पुष्टी करत आहोत. पी.जे. हे एक अत्यंत लोकप्रिय विनोदी कलाकार, अभिनेते, लेखक आणि प्रसारक होते. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आणि अद्भुत होता. रंगमंचावर असोत, दूरदर्शनवर असोत किंवा दररोज सकाळी आपल्या श्रोत्यांशी संवाद साधताना असोत लोकांना हसवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती."

चाहत्यांकडून श्रद्धांजली

पीजे गॅलाघर यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कामाच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी दुःख व्यक्त केले.

Actor Passes Away
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'चं आतापर्यंतचं सर्वात शॉकिंग एलिमिनेशन; 'हा' स्पर्धक घराबाहेर,चाहत्यांना मोठा धक्का

कोण होते पीजे गॅलाघर?

पीजे गॅलाघर हे आयर्लंडमधील लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन, अभिनेते, रेडिओ प्रेझेंटर आणि लेखक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९७५ रोजी झाला होता. अनेक वर्षांपासून ते मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. आपल्या विनोदी अभिनयातून आणि निरीक्षणशक्तीतून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांनी 'Meet Your Neighbours' आणि 'Makin' Jake' यांसारख्या स्केच कॉमेडी कार्यक्रमांमध्ये काम केले होते. याशिवाय आयर्लंडमधील विविध कॉमेडी शो आणि स्टँडअप कार्यक्रमांमध्येही त्यांनी परफॉर्मन्स केले.

टेलिव्हिजन आणि स्टँडअप कॉमेडीबरोबरच पीजे गॅलाघर यांनी रेडिओ क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. २०२१ पासून ते रेडिओ नोव्हाच्या 'Morning Glory' या लोकप्रिय ब्रेकफास्ट शोचे सूत्रसंचालन करत होते. याशिवाय त्यांनी सुझान केन यांच्यासोबत 'Dubland' या पॉडकास्टचे सह-सूत्रसंचालन केले होते.'Uncharted with Ray Goggins' आणि 'The Random Driving Test' यांसारख्या कार्यक्रमांमध्येही ते झळकले होते. अभिनय, विनोद, रेडिओ आणि पॉडकास्ट अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.