Death News : WWE विश्वावर शोककळा! प्रसिद्ध रेसलरचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन, चाहत्यांना मोठा धक्का

WWE wrestler passes away : WWE चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रेसलरचे निधन झाले आहे. ही बातमी समोर आल्याने कुस्तीविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
WWE wrestler passes away
Death NewsSAAM TV
Published On: 

WWE विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन रेसलर जर्मेन हेली (Jermaine Haley) उर्फ ब्रॉन्सन रीड याचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. WWE ने शनिवारी सोशल मीडियावर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत त्याच्या निधनाची माहिती दिली. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सौदी अरेबियात झालेल्या क्राउन ज्वेल स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतर काही आठवड्यांतच ही बातमी समोर आली आहे. ब्रॉन्सनच्या निधनामुळे WWE चाहते, सहकारी रेसलर्स आणि कुस्तीविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

WWE ने सोशल मीडियावर दिली निधनाची माहिती

WWE ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ब्रॉन्सन रीडच्या निधनाची बातमी शेअर केली. या निवेदनात कंपनीने त्याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ब्रॉन्सन हा केवळ रिंगमधील मोठा आणि प्रभावी खेळाडू नव्हता, तर तो एक उत्तम व्यक्ती, कुटुंबावर प्रेम करणारा माणूस आणि सहकाऱ्यांचा लाडका होता, अशा शब्दांत WWE ने त्याला श्रद्धांजली वाहिली. कंपनीने त्याची गर्भवती पत्नी Paige, त्यांची मुलगी, मित्र, सहकारी आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या. ब्रॉन्सनच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात WWE त्यांच्यासोबत असल्याचेही निवेदनातून सांगण्यात आले.

क्राउन ज्वेल स्पर्धेत झाली होती गंभीर दुखापत

मीडिया रिपोर्टनुसार, ब्रॉन्सन रीड शेवटचा सौदी अरेबियात झालेल्या क्राउन ज्वेल स्पर्धेत दिसला होता. या स्पर्धेदरम्यान वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियनशिपच्या सामन्यात त्याने हस्तक्षेप केला होता. ब्रॉन ब्रेकर आणि ऑस्टिन थिअरी यांचे विजेतेपद टिकवण्यासाठी तो मदतीला उतरला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी पेंटा आणि जे'व्हॉन इव्हान्स यांच्याविरुद्ध सामना सुरू असताना ओबा फेमीने हस्तक्षेप केला.यावेळी ओबा फेमीने ब्रॉन्सनला जोरदार धक्का देत टेबलवर फेकले. या प्रसंगानंतर त्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्याची आणि किडनीला दुखापत झाल्याची माहिती विविध वृत्तांमध्ये देण्यात आली होती.

उपचारांसाठी सौदी अरेबियातच राहावे लागले

क्राउन ज्वेल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर ब्रॉन्सनला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली. प्रकृती गंभीर असल्याने त्याला काही काळ सौदी अरेबियातच थांबावे लागले. त्यानंतर उपचार घेऊन तो अमेरिकेत परतल्याचे वृत्त समोर आले होते. WWE नेही यापूर्वी क्राउन ज्वेलमधील घटनेनंतर ब्रॉन्सन रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्याच्या निधनामागील वैद्यकीय गुंतागुंत आणि क्राउन ज्वेल स्पर्धेत झालेल्या दुखापती यांचा थेट संबंध असल्याचे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

WWE wrestler passes away
Jasprit Bumrah: रोहित शर्मा झाला कॅप्टन; बुमराहने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबई इंडियन्सला कळवला नकार

कोण होता ब्रॉन्सन रीड?

मीडिया रिपोर्टनुसार, ब्रॉन्सन रीडचे खरे नाव जर्मेन हेली होते. तो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी होता. WWE मध्ये त्याने ब्रॉन्सन रीड या नावाने आपली ओळख निर्माण केली. दमदार शरीरयष्टी, ताकदवान खेळ आणि रिंगमधील आक्रमक शैली यामुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.WWE मधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर काही काळ कंपनीपासून दूर राहिल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्याने पुन्हा WWE मध्ये पुनरागमन केले. त्याने NXT नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशिपसारखे महत्त्वाचे विजेतेपदही मिळवले होते. रिंगमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने जगभरातील कुस्ती चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

कुस्तीविश्वातून श्रद्धांजली

ब्रॉन्सन रीडच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर WWE चाहत्यांसह कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्याचे निधन झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या रिंगमधील कामगिरीसोबतच त्याचा स्वभाव आणि सहकाऱ्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांचीही आठवण काढली जात आहे. ब्रॉन्सन रीडच्या अकाली निधनामुळे WWE विश्वाने एक लोकप्रिय खेळाडू गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.