Shreya Maskar
शरीरावर कोणताही मार लागलेला नसताना निळे, जांभळे किंवा काळसर डाग शरीरावर दिसत असतील, तर त्यामागे काही आरोग्यविषयक कारणे असू शकतात.
त्वचेखालील लहान रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर साचल्यामुळे असे डाग तयार होतात. याला वैद्यकीय भाषेत Bruising किंवा Ecchymosis म्हणतात.
रक्तातील प्लेटलेट्स रक्त गोठवण्यास मदत करतात. त्यांची संख्या कमी झाल्यास त्वचेखाली रक्तस्राव होऊन निळे डाग पडू शकतात. डेंग्यू, काही संसर्ग आणि इतर आजारांमुळे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.
व्हिटॅमिन C शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करते. त्याची कमतरता झाल्यास रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात आणि सहज डाग पडू शकतात. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन K आवश्यक असते. त्याची कमतरता असल्यास सहज रक्तस्राव आणि निळे डाग दिसू शकतात.
यकृत रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने तयार करते. यकृताचे कार्य बिघडल्यास शरीरावर सहज निळे डाग पडू शकतात. कावीळ, पोट सुजणे आणि थकवा अशी लक्षणेही दिसू शकतात.
हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आनुवंशिक विकार आहे. यामध्ये किरकोळ दुखापतीनंतरही जास्त रक्तस्राव होऊ शकतो. काही वेळा सांध्यांमध्ये अंतर्गत रक्तस्रावही होतो.
हा रक्त आणि अस्थिमज्जेशी संबंधित कर्करोगाचा प्रकार आहे. यामध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास विनाकारण निळे डाग किंवा त्वचेवर लाल-जांभळे ठिपके दिसू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.