Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार? खात्यात खटाखट ३००० रुपये येणार

Maharashtra Government: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाडकींच्या खात्यात खटाखट ३००० रुपये जमा होणार आहेत.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्वाची बातमी.

  • लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार

  • ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाडकींच्या खात्यात ३००० रुपये येणार

  • ई-केवायसी सरकारकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली

राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना सरकारने मोठा दणका दिला आहे. पात्र असूनही लाडक्या बहिणींना गेल्या ३ हफ्त्यांपासून वंचित राहावं लागत आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र यात हजारो पात्र महिलांना अजूनही लाभ मिळालेला नाही. आता ई-केवायसीच्या नावाखाली यवतमाळ जिल्ह्यात महिलांची पुन्हा फरफट होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या ५२ हजार ११० लाभार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ हजार ५०० लाभार्थी लाडक्या बहिणी ६५ वर्षांवरील आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले. यातून ४८ हजार ५०० हून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत असे असले तरी त्या पात्र महिलांना गेल्या ३ हप्त्यांपासून वंचित राहावे लागत आहे. आता ई- केवायसीच्या नावाने लाडक्या बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये सापडली आहे. ई-केवायसीच्या नावाखाली राज्यातील लाडक्या बहिणींना रात्रभर जागून हे काम करून घ्यावे लागत आहे. हे काम करत असताना लाडकींना ओटीपी एररच्या अडचणीचा देखील सामना करावा लागत आहे. ई-केवायसीसाठी फक्त दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची सध्या धावपळ सुरू आहे. ई-केवायसी एररमुळे जर प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हफ्ता येईल की नाही? असा प्रश्न लाडकींना पडला आहे.

ई-केवायसी करताना येणाऱ्या एररबद्दल महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तांत्रिक अडचणींवर काम सुरू असल्याचे सांगितले. सरकारकडून या योजनेबाबत हे स्पष्ट करण्यात आले आहे की, ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे पात्र बहिणींना या दोन महिन्यांचे हप्ते मिळायला पाहिजे. पण जर दोन महिन्यामध्ये ई-केवायसीचे हे काम पूर्ण झाले नाही तर लाडक्या बहिणींना हप्ताचे पैसे येण्याचे थांबेल असा कुठलाही शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या कालवधीपूर्वी लाडक्या बहिणींना ई-केवायसीचे काम पूर्ण करण्याचे मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ११८० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Dharangaon : आश्रम शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण; धरणगाव तालुक्यात खळबळ, आरोग्य यंत्रणा नजर ठेवून

Divorce Celebration : माय लाइफ माय रूल! दुग्धाभिषेक केला, सूट बूट घालून केक कापला; घटस्फोटानंतर तरुणाचं जंगी सेलिब्रेशन | Video

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट|VIDEO

SCROLL FOR NEXT