Ladki Bahin Yojana news Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Ladki Bahin Yojana news : लाडकी बहीण योजनेचा चक्क भावांनी लाभ घेतला आहे. 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याची घटना उघडकीस आली आहे.

Suprim Maskar

लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय. त्यामुळेच लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरु असतानाच योजनेतला मोठा गैरव्यवहार उघड झालाय. या योजनेतील पुरुषांची घुसखोरी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात भावांनीच सरकारी पैशांवर कसा डल्ला मारलाय ते समोर आलयं.या योजनेतलं गैरव्यवहाराचं हे फक्त 'हिमनगाचे टोक' असल्याचा दावा एका अधिकाऱ्यानं केलाय. दी इंडियन एक्सप्रेसनं दाखल केलेल्या आरटीआयमधून काय माहिती समोर आली पाहूयात...

लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला

लाडकीच्या योजनेत लाडके भाऊ लाभार्थी

12 हजार 431 पुरुषांची योजनेत घुसखोरी

लाडक्या भावांकडून अद्याप वसुली नाही

लाडक्या भावांमुळे सरकारला 25 कोटींचा भूर्दंड

योजनेतल्या घुसखोरांकडून वसुली कधी?

दरम्यान लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार इतकाच मर्यादीत नाहीय...निकषात बसत नसतानाही कसा लाभ मिळवला ते पाहूया..

अपात्र असतानाही योजनेचा लाभ -

एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ

एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी

अपात्र असूनही सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला फायदा

उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असतानाही घेतला लाभ

स्वत:च्या नावावर चारचाकी वाहन असतानाही लाभ

मालमत्तेच्या माहितीबाबत चुकीचे दावे करत घेतला लाभ

दुसरीकडे 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलाय. त्यांची नावे यादीतून वगळून शिस्तभंगाची कारवाई सुरू झालीय. कुठल्या विभागातले किती कर्मचारी लाभार्थी आहेत ते पाहूया...

सरकारी कर्मचा-यांनीही लाटले पैसे

जिल्हा परिषद -1,183 लाभार्थी

आयुर्वेद संचालनालय - 817 लाभार्थी

समाजकल्याण आयुक्तालय - 219 लाभार्थी

कृषी विभाग आयुक्तालय - 128 लाभार्थी

आदिवासी विकास आयुक्तालय - 47 लाभार्थी

पशुपालन, दुग्धव्यवसाय - 6 लाभार्थी

लाडकीचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. तर दुसरीकडे पुरुषांनी 24.24 कोटी आणि अपात्र महिला लाभार्थ्यांनी 140.28 कोटींवर डल्ला मारलाय. त्यामुळे इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरु असताना प्रशासकीय यंत्रणा नेमकं काय करतंय? अपात्र लाभार्थ्यांकडून सरकार वर्षभरातील पैशांची वसुली करणार का ? हा खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT