Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख लाडक्या बहिणींना धक्का, यापुढे खात्यात येणार नाहीत पैसे, नेमकं कारण काय?

Fraudulent Claims Exposed in Ladki Bahin Scheme: मराठवाड्यामधील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. सव्वा लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यापुढे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. यामागचे कारणही समोर आलं.

Priya More

Summary -

  • मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले.

  • वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले.

  • अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तपासणी करून पात्र आणि अपात्र अर्जांची छाननी करण्यात आली.

  • अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे येणार नाहीत.

माधव सावरगावे, संभाजीनगर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला. मराठवाड्यात ६५ वर्षांवरील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. २१ वर्षांखालील तरुणींनी देखील योजनेचा लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते. तर एकाच घरात ३ जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही उघड झाले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला.

मराठवाड्यात देखील हा सर्वे झाला. जवळपास ६ ते ७ लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. २ टप्प्यात हा सर्वे झाला होता. त्यात पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील महिला आणि २१ वर्षांखालील तरुणींनी याचा लाभ घेतला होता का? याची चाचपणी करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यात १,३३,३३५ अर्ज तपासण्यात आले. त्यातील ९३००७ पात्र ठरले. तर ४०२२८ अपात्र ठरले.

तर दुसऱ्या टप्प्यात एक घरात २ पेक्षा जास्त लाभार्थी आहेत का? हे शोधण्यात आले होते . यात एकूण ४,०९०७२ अर्ज तपासण्यात आले. त्यातील ३,२४,३६५ पात्र ठरले तर ८४,७०८ अपात्र ठरले. म्हणजे या २ सर्वेक्षणाच्या माध्यमातून १,२४,९३७ महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. याबाबत प्रत्येक जिल्हास्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आणि ही आकडेवारी शासनाला सादर करण्यात आली.

६५ वर्षांवरील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे मराठवाड्यात एकूण तापसलेले १,३३,३३५ अर्ज तपासण्यात आले त्यामधील ९३,००७ महिलांचे अर्ज पात्र ठरले. तर ४०,२२८ महिलांचे अर्ज अपात्र ठरले. या सर्व ६५ वर्षांवरील महिला आहेत. ज्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून ६५ वर्षाच्या खाली दाखवून योजनेचा लाभ घेतला असल्याची बाब समोर आली.

छत्रपती संभाजी नगर -

एकूण अर्ज- २०,०६९

पात्र - १५,२०६

अपात्र - ४,८६३

लातूर -

एकूण अर्ज - १३,८६५

पात्र - ९,२०४

अपात्र - ४,६६१

जालना -

एकूण अर्ज - २२,२३३

पात्र - ६०१०

अपात्र- १६,२२३

बीड -

एकूण अर्ज - २३,६८८

पात्र - १८,२५१

अपात्र - ५,४३७

धाराशिव -

एकूण अर्ज - १२,२९३

पात्र- ८,१३८

अपात्र - ४,१५५

हिंगोली -

एकूण अर्ज - ११,५०३

पात्र -७००६

अपात्र - ४,४९७

नांदेड -

एकूण अर्ज - २३,२७०

पात्र - १५,१६५

अपात्र - ८,१०५

परभणी -

एकूण अर्ज - १६,४१४

पात्र- १४,०२७

अपात्र - २,३८७

तसंच, एकाच घरातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात शासनाकडून तपासणीसाठी आलेल्या अर्जाची संख्या होती४,०९,०७२ इतकी होती. यामधील ३,२४,३६३ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ८४,७०९ अर्ज अपात्र ठरले आहेत.

संभाजी नगर -

एकूण अर्ज -८४,७०४

पात्र - ६५,११२

अपात्र - १९,५९२

बीड -

एकूण अर्ज - ४७,९७५

पात्र -४५,६६८

अपात्र - २,३०७

लातूर -

एकूण अर्ज - ५५,०९२

पात्र - ३९,१४७

अपात्र - १५,९४५

जालना -

एकूण अर्ज - ५१,१४२

पात्र - २४,५७१

अपात्र - २६,५७१

धाराशिव -

एकूण अर्ज - ३७,०२०

पात्र - २८,०२९

अपात्र - ८,९९१

परभणी -

एकूण अर्ज - ३६,८६६

पात्र - ३३,७३८

अपात्र -३,१२८

हिंगोली -

एकूण अर्ज - २६,६४१

पात्र - २१,७४९

अपात्र - ४,८९२

नांदेड -

एकूण अर्ज -६९,६३२

पात्र - ६६,३४९

अपात्र - ३,२८३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

SCROLL FOR NEXT