Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: २ महिने संपले पण खात्यात पैसेच नाहीत, लाडक्या बहि‍णींच्या बँकेत चकरा,₹३००० कधी येणार?

Ladki Bahin Yojana November-December Installment: लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्याच्या हप्त्याची वाट महिला बघत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणी दोन महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

पैसे आले की नाही चेक करण्यासाठी महिलांच्या बँकेत चकरा

महापालिका निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का?

लाडकी बहीण योजनेत महिलांना मागच्या दोन महिन्यापासून योजनेचा लाभ मिळालेला नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत महिला नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून बाकी आहेत. दरम्यान, तरीही खात्यावर पैसे आले की नाही तपासण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकांना चकरा वाढल्या आहेत.

दोन महिने उलटून गेले तरी पैसे नाही

दोन महिने उलटून देखील योजनेचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते जमा न झाल्याने लाडक्या बहिणी सध्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत.

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे हा निधी रखडला असल्याची चर्चा आहे. बँक खात्यावर पैसे आले की नाही, हे तपासण्यासाठी महिलांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या लाडक्या बहिणीच्या खात्यावर अखेर पैसे कधी जमा होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का?

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुर आहे. १५ आणि १६ जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. याआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मकरसंक्रांतीचा मूहूर्त साधत १४ जानेवारी रोजी महिलांना पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. याचसोबत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. जर हा निर्णय झाला तर महिलांच्या खात्यात एकत्र ४५०० रुपये जमा केले जातील. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये शिवसेनेचा विजय म्हणजे वोट जिहाद, डॉ. हिना गावित यांचा घणाघात

Hair Care : केसांना सतत काळी मेहंदी लावल्याने काय नुकसान होते? जाणून घ्या

Bodycon Dresses Type: न्यू ईयरला 'हे' ट्रेंडी बॉडीकॉन ड्रेस नक्की ट्राय करा, दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Pickle Facts: जेवणात लोणचं खाणं पडेल महागात, वाढेल BPचा धोका

Thane : ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत विकत होते, पोलिसांनी फिल्डिंग लावून उधळला डाव; बदलापुरातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT