ladki bahin yojna  Saam tv
महाराष्ट्र

ladki bahin yojana : लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे अवघड; महायुतीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

ramdas athawale on ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. राज्य सरकारला लाडकीचे पैसे देणे अवघड जात असल्याचे आठवलेंनी सांगितलं.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील लाडक्या बहिणींचं १५०० रुपयांऐवजी २१०० कधी मिळणार, याकडे लक्ष लागलं आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये न मिळवण्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता याच योजनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं. 'लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे अवघड जात आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले आहे. पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, रामदास आठवले यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. केंद्रीय रामदास आठवले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर म्हणाले, 'सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. दलितांकडे कमी लक्ष दिलं जातंय. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात देण्याचा निर्णय घ्यावा. भाऊराव पाटील यांनी कमावा आणि शिका योजना सुरु केली. तशीच योजना सुरु करून महिना ५-१० हजार रुपये द्यावेत'.

औरंगजेबाच्या मुद्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्त कर्तुत्व निर्माण केलं आहे. तो चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे आहे. औरंगजेबाचा विनाकारण हा विषय काढू नये. कबर हटवण्याचा मागणीला आमचा पाठिंबा नाही. कबर हटवू नका, मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असावे. नागपुरात पूर्वनियोजन करून हिंसाचार घडवला. हिसांचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. हिंदूंना सांगतो की शांत राहा. विनाकारण वाद निर्माण करू नका. मुस्लीम समाजाने आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये'.

महाबोधी विहाराच्या वादावर बोलताना आठवले म्हणाले, 'गया येथील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या. मी स्वत: बौद्ध गया येथे जाणार आहे. आताचे ट्रस्टी रद्द करा. बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये इतारांना घेऊ नये'. महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या वादावरही आठवलेंनी भाष्य केलं. ' पालकमंत्रिपदाचा वाद मिटवायचा असेल, तर आरपीआयला मंत्रिपद द्या'.

दिशा सालियन प्रकरणावरही आठवलेंनी भाष्य केलं. 'दिशा सालियानच्या वडिलांनी चार नाव असलेले पत्र दिले. त्यात हत्या करणाऱ्यांच्या नावे होते. तिची हत्या झाली हे पालकांनी सांगितले. माझे असे म्हणणे नाही की, आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करू नका. कुणीही असेल तर कारवाई करावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT