
तबरेज शेख, साम टीव्ही
नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय संविधानावर मोठं भाष्य केलं आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाहीला लिहिलेल्या संविधानाला हात लावायची ताकद अजून कोणाला नाही. संविधानाला हात लावला तर त्याला आम्ही सोडणार नाही. एकदा आम्ही खवळलो, तर कोणालाही घाबरत नाही, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी इशारा दिला आहे.
नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं. नाशिकमधील या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आयएएस अधिकारी समीर वानखेडे, अभिनेत्री क्रांती रेडकर दएखील उपस्थित होत्या. या धम्म बौद्ध परिषदेला १० देशातील २५० धर्मगुरु आणि भंते उपस्थित होते.
नाशिकच्या काळाराम मंदिरात १९३० ते १९३५ या पाच वर्षांत प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना हा देश एक ठेवायचा होता. जगाच्या मानवाला शांततेचा संदेश देण्यासाठी गौतम बुद्धांना प्रयत्न केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आणि मृत्यू पौर्णिमेला झाला. त्यांनी दीक्षाही पौर्णिमेला घेतली. त्या काळात अनेक विचार, प्रश्न निर्माण व्हायचे. त्यामुळे बहुमताने निर्णय घेतला जायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी मोठी जबाबदारी आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणतात की, युद्ध नको बुद्ध हवे. आपल्याला या देशाला एका चांगल्या दिशेने पुढे घेऊन जायचं आहे. आम्हाला सर्व धर्माचा आदर करायचा आहे. आमचा भाईचारा आहे.
मुझे दुसरो की रस्तोपे चलने की आदत नही है. मुझे दुसरे उपर जलने की आदत नही है, लेकिन जो जलते है उसे मिलने की मेरी आदत है. बहुत लोग मेरे उपर जलते है उनको जलने दो. लेकिन में नही जलुंगा.
आज नाशिकमध्ये आहे बौद्ध धर्माची हवा, मग का मिळणार नाही प्रकाश लोंढेंना लाल दिवा.
नाशिक येथे मी दर वर्षी दोन मार्चला येतो. आज आम्हाला आनंद आहे की, बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळाराम मंदिरामध्ये राम मंदिरात जात आलं नाही , पण आज आम्ही गेलो. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याकाळी जाऊ दिले नाही.
एक देश अखंड देश ठेवायचा असेल, तर आपल्या सर्वांना एकत्र यायला हवे. आपल्या सर्वांच्या धर्माच्या परंपरा चालवायचा आपल्याला अधिकार आहे. आम्ही कोणत्या मंदिरात गेलो, तर हिंदू होत नाही. तर आम्ही बौद्ध आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पालीभाषा ही आपली भाषा आहे, बौद्धांची भाषा आहे. पाली भाषेला देखील नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आम्ही दुबईत देखील जागा मागितली आहे. त्या ठिकाणी देखील औद्योगिक हार उभारायचे आहे. मला अनेक देशातून फोन येत आहे की, आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे. ज्या देशात बौद्ध धर्म नाही, त्या ठिकाणी बौद्ध मंदिर उभारण्याचा आमचा मानस आहे. दुबईमध्ये रिपब्लिकन ग्लोबल ट्रस्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.