आम्ही 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठे दिसत नाही, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
भाजपवर नाराजी व्यक्त करत रामदास आठवले म्हणाले की, ''मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. छोटा जरी पक्ष असला तरी आम्हला जागा हव्यात. मागे देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलं होतं, ज्यात आम्हला किमान पाच जागा हव्यात, असं म्हटलं होतं. कार्यकर्ते नॉमिनेशनसाठी जाणार नाही, असे म्हणतात. 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठे दिसत नाही, मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.''
आठवले म्हणाले की, ''धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी, हा आमचा आग्रह आहे. महामंडळाची मागणी केली आहे. जिल्हापरिषद, महापालिका यासंदर्भात चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे.''
ते म्हणाले, ''मी केंद्रात मत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो. महायुतीत जागा मिळाल्या पाहिजे. मला वाईट वाटतंय, आम्ही सातत्याने महायुतीसोबत आहोत. नांदेडमधील जागा हवी होती, अनेक जागा हव्या होत्या, आम्ही 5-4 जागांची अपेक्षा ठेवली होती. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, त्यात आमच्या मागण्या आहेत.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, ''एक एमएलसी देखील आम्हाला हवी आहे. काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यापेक्षा तुम्हाला खिळखिळा करतो. उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं. उद्धव ठाकरे हे महायुतीसोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटले नसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.