राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीत नऊ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यातच बीडच्या परळी मतदारसंघात शरद पवारांनी काँग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत उमेदवारी दिलीय.
या ठिकाणी जातीय समीकरण साधण्यासाठी पवारांनी मराठा कार्ड खेळले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात उतरलेल्या धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी आता शरद पवारांनी तयारी पूर्ण केल्याचे दिसत आहे. परळी मतदारसंघातील ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनेक उमेदवार इच्छुक होते. परंतु शरद पवारांनी मराठा कार्डला प्राधान्य देत काँग्रेसच्या नेत्याला पक्षात घेत संधी दिल्याने याची चर्चा होत आहे. तिसऱ्या यादीत शरद पवार गटाकडून कोणाला कुठून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, हे जानूनं घेऊ...
१. करंजा - ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माझलगाव - मोहन बाजीराव जगताप
8. परळी - राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम
दरम्यान, शरद पवार गटाने आपल्या पहिल्या यादीत ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. तर दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांची नवे जाहीर केली होती. यातच आता शरद पवार गटाने आतापर्यंत एकूण ७६ उमेदवार जाहीर केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.