LADKI BAHIN YOJANA UPDATE saam tv
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना E-KYC मुदत वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

Ladki Bahin Yojana E-KYC Deadline Extension Latest News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ, थकीत हप्ते आणि दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक. छगन भुजबळ यांनी दिले महत्त्वाचे आश्वासन.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील पात्र महिलांचे थकीत आणि नियमित हप्ते, ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ तसेच दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत आवश्यक प्रस्ताव मांडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालायत झालेल्या बैठकीत महिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लाडकी बहीण योजेनेच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते, ई-केवायसीसाठी मुदतवाढ आणि मानधनवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णयासाठी प्रयत्न केले जातील असे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज नोंदणीचे काम केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनही अद्याप प्रलंबित आहे. वित्त विभागाची मान्यता घेऊन हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.

अंगणवाडी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनाही दिलासा

बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनासाठी १५२.६१ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत स्वयंपाकी आणि मदतनीसांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याची महिलांची मागणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकषांनुसार अनेक लाभार्थी महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याने ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी राज्यातील विविध भागांत महिलांकडून आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे आता ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार का, तसेच लाडक्या बहिणींच्या मासिक मानधनात वाढ होणार का, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणची वाहतूककोंडी सोडवा, चाकणला महापालिका करा - दिलीप मोहिते- पाटील

दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार; गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास रखडला? १५ दिवसांनंतरही गूढ कायम, ३ निकटवर्तीय फरार

Easy Rangoli Designs For Diwali: रांगोळी काढण्यासाठी वेळ नाही? मग अवघ्या 5 मिनिटांत काढा सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स

Coffee Drinking Tips Before And After Gym: जिमआधी की जिमनंतर, कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT