Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Ladki Bahin Yojana August Month Installment: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरित केला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

सरकारने घेतला मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरित

लाडकी बहीण योजनेबाबात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मूहूर्त ठरला आहे. आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे. ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी वितरीत केला आहे.

लाडकीच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरित

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) राज्यात २ कोटी ४८ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत जुलपर्यंतचे दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

मात्र, ऐन गणेशोत्सवात ऑगस्टचा हप्ता मिळेल, अशी आशा महिलांना होती. मात्र, असं काहीच झालं नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरु होऊनदेखील १० दिवस झाले. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत.

दरम्यान, महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare)यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये या योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

KDMC News : वाहतूक कोंडीमुळे १ मिनिटे उशीर झाला, केडीएमसीच्या नोकरभरतीची उमेदवारी हुकली, परीक्षार्थींचा संताप

Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गेवराईत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT