Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट- सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana August-September Installment Update: लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, काही महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाहीये.
Published on
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाही पुढचा हप्ता

महिलांट्या अर्जांची पडताळणी सुरु

सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला असला तरीही अजून ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देण्यात येणार नाहीये.यामागचे कारण जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीला ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? ₹३००० रुपयांची घोषणा होण्याची शक्यता

या महिलांना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता (These Women Will Not Get August-September Month Installment)

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, जर कोणी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. या महिलांना योजनेअंतर्गत यापुढे पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या नावाखाली नागपूरातील ११२९ नोकरदार महिलांनी पैसे लाटले; सरकार कारवाई करणार

२६ लाख महिलांची पडताळणी (Ladki Bahin Yojana Reverification)

लाडकी बहीण योजनेत २६ लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे, याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. त्यानंतर या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहे. महिलांच्या घरात लाडकी बहीण योजनेचे किती लाभार्थी आहेत. घरात कोणी टॅक्स तर भरत नाही ना, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नाही ना, या सर्व गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतरच महिला पात्र आहेत की अपात्र हे ठरवले जाते. या पडताळणीतून ज्या महिला अपात्र ठरतात त्यांचे अर्ज बाद केले जातात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com