LADKI BAHIN YOJANA PROTEST IN AKOLE OVER KYC ISSUES Ai image
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : पात्र असताना १५०० रुपये बंद, लाडक्या बहिणींचा वर्षावर आंदोलनाचा इशारा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचे अनुदान केवायसीच्या कारणामुळे बंद झाल्याचा आरोप करत अहिल्यानगरमधील महिलांचा अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा. २६ ऑक्टोबरला वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा इशारा

Alisha Khedekar

महाराष्ट्रात २०२४ पासून सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. गरजू महिलांना मदत मिळावी म्हणून ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा फायदा लाखो महिलांना झाला. मात्र काही नियमांमुळे अनेक महिलांना यातून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे अनेक महिला नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना पात्र असूनही केवायसी (KYC) प्रक्रियेचे कारण देत अपात्र ठरवण्यात आल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे. या महिलांनी येत्या २६ ऑक्टोबर रोजी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, योजनेसाठी पात्र असतानाही केवायसीच्या कारणामुळे अनेक महिलांचे अनुदान बंद झाल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी महिलांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरखर्च, दैनंदिन गरजा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना या अनुदानाचा मोठा आधार मिळत होता. मात्र, अचानक अनुदान बंद झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. केवळ केवायसीच्या कारणास्तव पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच योजनेतील अटी आणि शर्ती रद्द करून लाभार्थी महिलांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे बंद झालेले अनुदान तातडीने सुरू करावे, अटी रद्द कराव्यात आणि संबंधित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येत्या २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलक महिलांनी दिला आहे. आता राज्य सरकार या महिलांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि लाडक्या बहिणींचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहरात २० टक्के पाणी कपात; खडकवासला धरणात ८२ टक्के पाणीसाठा

Fruit Storage Tips: फळे फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर?

Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं

Bombay High Court: अविवाहित सज्ञान मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार - मुंबई उच्च न्यायालय

Skin Care: नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय; स्किन दिसेल क्लिन आणि ग्लोईंग

SCROLL FOR NEXT