Alisha Khedekar
पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे हे जठराच्या कॅन्सरचे संभाव्य लक्षण असू शकते.
थोडेसे अन्न खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत असेल, तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
अचानक भूक कमी होणे किंवा खाण्याची इच्छा न होणे ही समस्या दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आहार किंवा व्यायामात बदल न करता वजन झपाट्याने कमी होत असल्यास त्यामागील कारण तपासणे आवश्यक आहे.
वारंवार अपचन, पोट फुगणे किंवा जेवल्यानंतर अस्वस्थता जाणवणे ही लक्षणे कायम राहिल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्या.
वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे यामागे अनेक कारणे असू शकतात. ही लक्षणे टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा