Ladki Bahin Yojana  x
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. या पडताळणीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Updates : राज्य सरकारच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परीणाम करणाऱ्या लाडक्या बहिण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरु आहे. अपात्र लाडकींचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये काही जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय.

सरकारकडून राज्यातील सुमारे 26 लाख संशयित लाभार्थ्यांच्या गृहचौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 4 हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्यात आलीय. यामध्ये तब्बल 84 हजार अर्ज एकाच घरातील 3 किंवा अधिक महिलांचे असल्याचं समोर आलंय..तर 20 हजार अर्ज 21 वर्षांखालील किंवा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थींचे आहेत. या सर्व अपात्र अर्जदारांचा लाभ सरकारकडून थांबवण्यात आलाय..

एकाच घरात दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळल्यास, नेमक्या कोणत्या महिलांना लाभ द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कुटुंब प्रमुखाला देण्यात येणार आहे. यामुळे अनेक कुटुंबात महाभारत सुरु झालंय. अंगणवाडी सेविकांनीही यावरुन आपली कैफीयत मांडली.

गेल्या तीन महिन्यांत 435 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेण्याचे अर्ज सादर केले आहेत. या योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच सुरू असलेल्या पडताळणीमुळे लाखो बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भारही कमी होणार आहे. हे निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी करणार सामूहिक उपोषण? सरकारला इशारा

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

Weight Loss : वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रोज एक वाटी प्या 'ही' डाळ, चविष्ट रेसिपी लिहून घ्या

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं, किरकोळ वादाचा भयानक शेवट

Banana Vs Dates Benefits: केळी की खजूर? आरोग्यासाठी फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT