Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladaki Bahin Yajana : 'लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्टला राज्यस्तरीय लाभ हस्तांतरीत कार्यक्रम; महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अजित पवारांच्या सूचना

Sandeep Gawade

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व त्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांच्या खात्यावरील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यात होईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा श्री. पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमासाठी लांबून महिला येणार असल्याने त्यांच्या येण्याजाण्याची, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्याप्रकारे करा. त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पुरेशी बैठकव्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता आदी चोख व्यवस्था करावी. महिला भगिनींनी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले. डॉ. दिवसे यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे नियोजन केले असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT