uddhav thackeray News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कोकणातून ठाकरे गट हद्दपार होणार? पक्षाचा डॅशिंग आमदार साथ सोडणार? VIDEO

Uddhav Thackeray News : कोकणात ठाकरे सेनेला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.. कारण आमदार भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवलीय.. मात्र भास्कर जाधवांच्या नाराजीची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

भास्कर जाधव...ठाकरे सेनेचे कोकणातील एकमेव आमदार... मात्र पक्षात वारंवार डावललं जात असल्याचं सांगत भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय... त्यामुळेच भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय... तर आता खुद्द उद्धव ठाकरेच जाधवांची मनधरणी करणार असल्याची माहिती समोर आलीय...

विधानसभा निवडणुकीत कोकणातील ठाकरे सेनेचे बुरुज ढासळले.... मात्र भास्कर जाधवांनी गड राखला...त्यानंतर भास्कर जाधवांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती... मात्र भास्कर जाधवांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात...

8 वेळा निवडून येऊनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत

जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंची विधीमंडळ नेतेपदी निवड

संघटनात्मक पातळीवर क्षमतेप्रमाणे संधी न मिळाल्याची खंत

विनायक राऊत आणि संजय राऊतांशी असलेले पक्षांतर्गत मतभेद

तर राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या... तेव्हा उदय सामंतांनीच जाधवांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली..मात्र ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चांवर अखेर भास्कर जाधवांनी मौन सोडलंय.

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला... मात्र लोकसभा निवडणुकीत कोकण ठाकरेंच्या हातून निसटलं... तर विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव वगळता कोकणात ठाकरेंच्या सेनेचा धुव्वा उडाला... मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारणार की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जाणार? यावर कोकणातील सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT