राज्यात पर्यटनासाठी कोकणाला मोठी पसंती असते. हिरवागार निसर्ग आणि सागर किनाऱ्याची सर्वांनाच भूरळ पडते. त्याशिवाय आदरातिथ्य आणि ताज्या मासळीचं आकर्षण आहेच. मात्र तुम्ही जर कोकणात जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी जरुर बघा...कारण या घटनेनं पर्यटकांमध्ये दहशत पसरलीय.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या दोन पर्यटकांना वाईट अनुभव आलाय. त्य़ांना बेदम मारहाण करण्यात आली. निमित्तही अगदी किरकोळ होतं. एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी ते थांबले होते. यावेळी चहाच्या कपात माशी पडली. नवीन चहा दे नाहीतर पैसे देणार नाही, या पर्यटकांच्या मागणीनं वाद वाढला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हॉटेल मालकासह अन्य 5-6 जणांनी एका पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान कुडाळ येथील झाराप खान मोहल्ला येथे राहणारे आणि मारहाण करणाऱ्या तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटन ही प्रतिमा असलेल्या जिल्ह्यात अशी घटना खपवून घेतली जाणार नाही, अशा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय.
शेजारचा गोवा आणि दक्षिण किनारपट्टीवरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात कोकणात पर्यटकांना अशा मारहाणीचा घटना घडत असतील तर येवा कोकण आपलोच आसा म्हणण्याला काय अर्थ आहे. पर्यटकांचा आदर होत नसेल तर कोकणाला कितीही कॅलिफोर्नियाची उपमा दिली तरी पर्यटनं विकास कसा होणार? यासाठी स्थानिकांना पर्यटकांच्या आदरतिथ्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.