Nitin Gadkari News: १५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावे असे, यावेळी गडकरींनी सांगितले. (Latest Marathi News)
मोठ्या आणि विकसीत जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसीत जिल्ह्यात दोन अशी किमान १५० ते २०० युनीट सुरू करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावे असे गडकरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ किमी लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ किमी लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ किमी लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये ब्लॅकस्पॉट दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पुल यांची ६८ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.
यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात किमीच्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.