Explainer : इम्रान खान यांच्या अटकेचा भारतावर काय परिणाम होणार?

Imran Khan Arrest: सध्या पाकिस्तानची परिस्थिती कशी आहे? इम्रान खानला नेमकी का अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेचा भारतावर परिणाम होणार का?
PTI chief Imran Khan Arrest
PTI chief Imran Khan Arrestsaam tv

>> जतिन देसाई, राजकीय विश्लेषक

गेल्या तीन-चार महिन्यापासून इम्रान खान यांना अटक होईल अपेक्षित होतं. मार्च महिन्यात इम्रान खानला लाहोरमध्ये अटक करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्या ठिकाणी इमरान खानचे समर्थक मोठ्या संख्येने गोळा झाले त्यामुळे तिथे पोलिसांना इम्रान खानला अटक करता आलं नाही. त्यानंतर आज आज इस्लामाबादमधून त्यांना अटक करण्यात आली. ते शहर फक्त बाबू लोकांचं आणि राजकारणाचा शहर आहे. सामान्य माणसं त्या ठिकाणी फारसे राहत नाहीत. त्यामुळे तिथे इम्रान खानला सहज अटक करता येईल अशा स्वरूपाने प्लॅन करून अटक करण्यात आली.

इम्रान खानची लोकप्रियता प्रचंड वाढली

पाकिस्तानात इम्रान खानची लोकप्रियता गेल्या दीड वर्षात प्रचंड वाढली आहे. अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून इम्रान खानची सत्तेतून हकलपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांच्या लोकप्रियेतेत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की आज निवडणुका झाल्या तर इम्रान खान सहज निवडून येईल अशा स्वरूपाची त्यांची स्थिती आहे. परंतु इमरान खान पंतप्रधान होऊ नये असं तिकडच्या लष्कराला वाटतं, तसेच तिकडचे जे काही सत्यदारी पक्ष त्यांचीही हीच इच्छा आहे.

लष्कर आणि इम्रान एकमेकांविरोधात

पाकिस्तानी लष्कर आणि इमरान खान हे एकमेकांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना तो पुन्हा सतत येऊ नये असं वाटतं. 2018 साली इमरान खान पंतप्रधान म्हणून निवडून आले, तेव्हा लष्करांनी त्यांना सत्तेवर बसवलं. म्हणजे लष्कराने इमरान खानला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आज इमरान खान आणि लष्करांचे संबंध बिघडले आहेत आणि सध्याचे काही सरकार आहे त्यांना इमरान खान सत्तेत यावसं वाटत नाही. कुठल्याही परिस्थितीत त्यांना तुरुंगात ठेवायचं आणि याचाच भाग म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे.

PTI chief Imran Khan Arrest
Imran Khan Arrest Video: कॉलर अन् मानेला धरलं, ढकलत ढकलत गाडीत बसवलं; इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ समोर

तालिबानचा समर्थक आहे इम्रान खान

सामान्य माणसात इम्रान खान यांचा जनाधार आहे ही वस्तुस्थिती आहे, खरं म्हटलं तर आज इमरान खानची अटक केल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. अशा पद्धतीने त्याची अटक म्हणजे त्याला एकप्रकारे मदत केल्यासारखेच आहे. इम्रान खानचं राजकारण नेहमी दहशतवादांच्या बाजूने राहिला आहे. इम्रान खान खऱ्या अर्थाने तालीबानचा सपोर्टर आहे, तालिबानचा समर्थक आहे. दहशतवादी संघटनांसदर्भात इम्रान खानने कधीही तोंड उघडलं नाही. ही वस्तुस्थिती पाकिस्तानच्या राजकारणात आहे.

भारतीय राजकारणावर परिणाम होणार का?

इम्रान खानच्या अटकेचा भारताच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. परंतु दहशदवादाचा समर्थक असलेला इम्रान खान पुन्हा सत्तेत येण पाकिस्तानातील सर्वसामान्य माणसासाठी, भारतासाठी आणि एकूण जागतिक शांततेचा विचार केला तर फारसे चांगलं होणार नाही. इमरान खानचा लोकप्रियता वाढणं हे भारताच्या दृष्टीने आणि एकूण जागतिक शांततेच्या दृष्टीने फारशी चांगली गोष्ट नाही. कारण इम्रान खान दहशतवाद समर्थक राहिलेला आहे अफगाणिस्तान तालिबानच्या बाजूने राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी तालिबाननी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. काबुल घेतलं तेव्हा इम्रान खानने खऱ्या अर्थाने अफगाण जनता गुलामगिरीतून मुक्त झाली असे वक्तव्य केले होते. तेव्हाही त्याने तालिबानचं समर्थन केलं होतं. म्हणून इम्रान खानची लोकप्रियता वाढणं भारताच्या दृष्टीने एकूण जागतिक शांततेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला

पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अत्यंत डबघाईला आलेली आहे. डॉलर्सचा विचार केला तर एक डॉलर म्हणजे 250 च्या आसपास पाकिस्तान रुपयाची किंमत झालेली आहे. भारताचे शंभर रुपये म्हणजे पाकिस्तानचे जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे रुपये एवढी पाकिस्तानची चलनाची किंमत पडली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खालावली आहे. पाकिस्तानच्या ज्या काही गारमेंट इंडस्ट्री आहेत ते मोठ्या प्रमाणात बांगलादेशात चालल्या आहेत. पाकिस्तानतील उच्च मध्यमवर्ग पाकिस्तानच्या बाहेर जात आहे. पाकिस्तानने आयएमएफकडे पैसे मागितल्या नंतर आयएमएफने काही प्रमाणात मदत केली आहे.

PTI chief Imran Khan Arrest
Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, मारहाण आणि काहीतरी अनुचित केल्याचा PTI चा आरोप

पाकिस्तानला भूमिका बदलावी लागेल

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की त्यांना आता जगातल्या इतर देशांकडून पैसे मागायला लाज वाटायला लागली आहे. हे पाकिस्तानचे पंतप्रधान यांचे शब्द आहेत. या सगळ्याचा परिणाम निश्चितच पुढच्या अर्थव्यवस्थेवर होणार आणि पुढचे काही दिवस संप स्ट्राइक अशा स्वरूपात राहू शकतो. एकूण अर्थव्यवस्थेसाठी जे काही आवश्यक आहे ते पुन्हा ठप्प होणार आहे. पाकिस्तान अत्यंत वाईट अवस्थेतून चालला आहे. त्यातून बाहेर पडायचं असेल तर पाकिस्तानने कुठेतरी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. (Pakistan News)

इम्नान खान यांना अटक का केली?

पाकिस्तानात खऱ्या अर्थाने इमरान खानची अडचण आहे. पुढच्या एक दोन महिन्यात निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा इमरान खानची आहे. परंतु पाकिस्तानच्या लष्करांना आणि राजकारण्यांना लवकर निवडणुका नकोत. लवकर निवडणुका घेतल्या तर इम्रान खान सत्तेत येईल. म्हणून इम्रान खानला निवडणुकीत उतरता येणार नाही त्याच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही या दृष्टीने एकूण त्यांचा विचार सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून इम्रान खानला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com