Mumbai-Goa Highway: 'गणेशभक्तांचे मेगाहाल', मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; 10 किमीपर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा

Mumbai-Goa Highway Update: 'गणेशभक्तांचे मेगाहाल', मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; 10 किमीपर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा
Mumbai-Goa Highway Update
Mumbai-Goa Highway UpdateSaam Tv
Published On

>> सचिन कदम

Mumbai-Goa Highway Traffic Update News:

मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवा करता कोकणात निघाले असून मुंबई गोवा महामार्गावर गणेशभक्तांचे मेगा हाल होत आहेत. पनवेल ते इंदापूर हे केवळ दोन तासांचे अंतर पार करायला आठ तासांचा कालावधी लागत आहे.

माणगाव, इंदापुर, कोलाड, वाकण या ठिकाणी डायव्हर्शनमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. मंत्र्यांनी दिलेली अश्वासन फोल ठरल्याची प्रतिक्रिया चाकरमानी देत आहेत.

Mumbai-Goa Highway Update
Lower Parel Bridge: मुंबईकरांच्या वाहतुक कोंडीची चिंता मिटली, 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'डीलाईल रोड ब्रिज' वाहतुकीसाठी खुला

शासनामार्फत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन सुस्थितीत करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे खड्डे मुक्त रस्ता तयार झाला असला तरी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना चाकरमानी गणेशभक्तांचे हाल होत आहेत. (Latest Marathi News)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मंदावला

दरम्यान, पुणे मुंबई द्रुतगती मार्गही मंदावला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत.परिणामी द्रुतगती मार्गावर याचा ताण आलाय. वाहनांच्या वाढलेल्या संख्येनं बोरघाटात मार्ग मंदावला आहे.

Mumbai-Goa Highway Update
Shivsena News : शिवसेना ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; सेनाभवनासमोरच शिंदे गटाची नवी शाखा

अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढं सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहचायचं आहे, पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com