Shivsena News : शिवसेना ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; सेनाभवनासमोरच शिंदे गटाची नवी शाखा

Mumbai Shivsena News : शाखा क्रमांक १९४ चे आज उद्धघाटन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
Shivsena
Shivsena Saam TV

Mumbai News :

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पक्षात पडले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं. मात्र सेनाभवन उद्धव ठाकरे यांच्या गटाकडेच आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट खऱ्या अर्थाने एकमेकांसमोर येणार आहे.

कारण शिवसेना भवनासमोरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेची शाखा सुरू होत आहे. शाखा क्रमांक १९४ चे आज उद्धघाटन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. (Political News)

Shivsena
Sangli Maratha Morcha News: आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार! सांगलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा; लाखोंचा सहभाग

यावेळी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष बसेसही सोडण्यात येणार आहे. शिवसेना भवनसमोरच स्थानिक आमदार सदा सरवणकर यांची शाखा सुरू होणार असल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. (Latest Marathi News)

Shivsena
Marathwada MuktiSangram Din : 'रझाकारांना धडा शिकवलात, आता 'सजा'कारांना शिक्षा द्या; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. मात्र सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही गटांच्या आमदरांची एकत्रित सुनावणी घेण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला.

ठाकरे गटानं सादर केलेली कागदपत्रे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळे आमची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत. गणेशोत्सव असल्यानं आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करुन उत्तर पाठवू. शिंदे गटाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य करत वेळ वाढवून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com