Marathwada MuktiSangram Din : 'रझाकारांना धडा शिकवलात, आता 'सजा'कारांना शिक्षा द्या; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Raj Thackeray Post On Marathwada Muktisangram Din: मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यात मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

Raj Thackeray News:

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मराठा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यात मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. काल (शनिवार, १६ सप्टेंबर) मंत्रीमंडळाची बैठकही छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. मंत्रीमंडळ बैठकीतून मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या असतानाच राज ठाकरेंनी मात्र राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray Latest News
Nanded News : गिरीष महाजन यांच्यासमोर 'पालकमंत्री चले जाव'च्या घोषणा, सकल मराठा समाजाकडून काळे झेंडेही दाखवले

काय म्हणाले राज ठाकरे?

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतून मराठवाड्यासाठी (Marathwada) 45 हजार कोटींची विकासकामे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. याच घोषणांचा मुद्दा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

"आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.

"पण हे करताना फक्त 'फोटो-ऑप' म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही.. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे..."

जनतेने प्रश्न विचारण्याची गरज...

पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे.

अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.

'सजा'कारांना शिक्षा द्या.

तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे.

मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या 'सजा'कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा. (Latest Marathi News)

Raj Thackeray Latest News
Happy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते! PM मोदींचा आज वाढदिवस; देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com