Girish Mahajan News
Girish Mahajan NewsSaamn TV

Nanded News : गिरीष महाजन यांच्यासमोर 'पालकमंत्री चले जाव'च्या घोषणा, सकल मराठा समाजाकडून काळे झेंडेही दाखवले

Girish Mahajan News : गिरीष महाजन यांच्या ताफ्यासमोर सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली.
Published on

संजय सूर्यवंशी

Nanded News :

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी नांदेडला आलेल्या पालकमंत्री गिरीष महाजन यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. गिरीष महाजन यांच्या ताफ्यासमोर सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली.

गिरीष महाजन यांना काळे झेंडे दाखवून 'पालकमंत्री चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीष महाजन नांदेडला आले होते. (Latest News Update)

Girish Mahajan News
Mumbai Goa Highway Traffic: चाकरमानी निघाले गावाला! मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; ट्रेन- बसेस हाऊसफुल

दरम्यान मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात लोकप्रतीनिधी आणि पालकमंत्र्यानी सहभागी होऊ नये, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता. त्यानुसार कार्यक्रमस्थळाबाहेर मोठ्या प्रमाणावर समाजबांधव जमले होते. पालकमंत्र्यांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेलले. (Viral VIdeo)

Girish Mahajan News
Heart Attack Death : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन करण्यात आले. त्यापुर्वी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह अन्य नेत्यांनी पुष्पचक्र अर्पन करुन मराठवाडा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com