Vinayak Patil’s Switch to BJP Strengthens Fadnavis Camp Saam
महाराष्ट्र

कोल्हापूरात काँग्रेसला जबरी धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ

Vinayak Patil’s Switch to BJP Strengthens Fadnavis Camp: कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं. विनायक पाटील यांच्याकडून काँग्रेसला जय महाराष्ट्र. लवकरच भाजप पक्षात जाणार.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का.

  • कोल्हापुरातील विनायक पाटील यांच्याकडून काँग्रेसला सोडचिठ्ठी.

  • लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी राजकीय उलथापालथ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून काँग्रेसच्या सतेज पाटील यांना धक्का बसला आहे. विनायक उर्फ अप्पी पाटील लवकरच कमळ हाती घेणार आहेत. अलिकडेच विनायक पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता ते लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विनायक पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश कऱणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठं बळ मिळणार आहे.

विनायक पाटील यांचा पक्ष प्रवेश सोहळा १ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत विनायक पाटील भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. दरम्यान, विनायक पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

विनायक पाटील यांच्यासोबत महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खमलेटी, श्रीशैल पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे चंदगडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT