Satej Patil Vs Dhananjay Mahadik Saamtv
महाराष्ट्र

Dhananjay Mahadik: 'सतेज पाटील वैफल्यग्रस्त; कट रचून एमडींना मारहाण...' धनंजय महाडीकांचे गंभीर आरोप

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ३ जानेवारी २०२४

Satej Patil Vs Dhananjay Mahadik:

कोल्हापूरमध्ये कॉंग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांच्यामधील वाद उफाळून आला आहे. मंगळवारी (२, जानेवारी) राजाराम साखर कारखान्याच्या संचालकांना सतेज पाटील यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. कारखान्याविरोधात सतेज पाटील यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर संचालकांना बेदम मारहाण करण्यात आल्याने महाडिक गटही आक्रमक झाला आहे. या मारहाणीनंतर खासदार धनंजय महाडीक यांनी बंटी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले धनंजय महाडीक?

"सतेज पाटील (Satej Patil) हे स्वतः मनोरुग्ण आहेत. त्यांना स्वतःची बुद्धी आणि विचार नाही. सत्ता नसल्यामुळे ते विचित्र वागत आहेत. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा दारुण पराभव झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. निवडणुकीच्या निकालात सभासदांनी त्यांचा अपमान केल्याने तो अपमान त्यांना मनामध्ये सलग असावा.." अशा शब्दात धनंजय महाडीक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

एमडींवर कट रचून हल्ला...

"सकाळी त्यांनी कारखाना विरोधात फार्स करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी लगेच कारखान्याच्या एमडी यांचा पाठलाग करून पूर्वनियोजित कट करून त्यांना अडवून रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत, रक्तस्त्राव होईपर्यंत त्यांना मारहाण केली. कारखान्याच्या एमडींना गाडीतून ओढून लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यांच्या तोंडातून रक्त आलेले आहे. या कटामागे बंटी पाटील आहेत" असा गंभीर आरोप धनंजय महाडीक यांनी केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतिहासातील काळा दिवस..

"कारखान्याच्या एमडींना मारहाणीचा प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणावा लागेल. ऊस वेळेत गेला नाही किंवा ऊसाला तोड वेळ मिळाली नाही, म्हणून एमडींना मारहाण करण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झालेला नाही..." असे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) म्हणाले.

तसेच "सर्व साखर कारखानदार, सर्व चेअरमन, सर्व संचालकांना, एम.डी, अधिकारी आणि नॅशनल फेडरेशन शुगर, त्याचबरोबर महाराष्ट्र साखर संघ यांनी एक भूमिका घेतली पाहिजे. अशा गुंडांना चाप बसला पाहिजे, नाहीतर ही प्रवृत्ती फोफावत कामा नये, या सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT