kolhapur, Independence Day 2023, SP Mahendra Pandit saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Police Alert: रांगड्या काेल्हापुरवर दहशतवाद्यांची नजर? अंबाबाई मंदिर, धरणांवर पाेलिसांचा वाॅच : एसपी महेंद्र पंडीत

Independence Day 2023 : कूठेही संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी नजीकच्या पाेलिस ठाण्यात कळवावे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : पीएफआय (popular front of india) या दहशतवादी संघटनेबराेबर संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या अधिका-यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काेल्हापूर पाेलिस दल सतर्क आहे. पाेलिसांकडून अंबाबाई मंदिर, धरणे आदी स्थळांचा आढावा घेतला जात असल्याची माहिती एसपी महेंद्र पंडीत (superintendent of police mahendra pandit) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

देशातील पाच राज्यात एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) छापेमारी केली. त्यामध्ये काेल्हापूरातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. एनआयएच्या अधिकारी यांनी तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून महत्त्वाची कागदपत्रे, शस्त्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे साहित्य जप्त केले आहे. (Maharashtra News)

दरम्यान एसपी महेंद्र पंडीत म्हणाले NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. याचे सर्व ऑपरेशन्स त्यांच्या माध्यमातूनच राबवतात. यामध्ये गोपनीयता असते. जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे तीच आमच्याकडे सुद्धा आहे.

अंबाबाई मंदिर, धरणांवर पाेलिसांची सतर्कता

पुण्यात ताब्यात घेतलेल्या अतिरेक्यांबाबत बाेलताना एसपी पंडीत म्हणाले या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ATS तपास करत आहे. 10 ऑगस्टला याबाबतचे एक मोक ड्रिल घेतले आहे. सध्या आम्ही अंबाबाई मंदिर, धरणे आदी स्थळांचा आढावा घेत आहाेत. त्याशिवाय सर्व यंत्रणा अधिक सतर्क असल्याचेही पंडीत यांनी नमूद केले.

ज्वेलर्स अपहरणाचा तपास सुरु

जयसिंगपूर येथील ज्वेलर्सच्या अपहरणाचा तपास सुरु असल्याची माहिती एसपींनी दिले. पंडीत म्हणाले रात्री दुकानातून परत येत असताना वडील आणि पुतण्या यांचे पांढऱ्या गाडीतून अपहरण केले गेेले. पाेलिसांनी त्यानंतर तात्काळ नाकाबंदी केली.

स्थानिक गुन्हेची पथके तैनात केली आहेत. संशयित आरोपींनी संबंधित व्यक्तींना सोडून दिले आहे. हे नेमकं काय अपहरण झाले याबाबत आम्ही तपास करत आहे. जयसिंगपूर येथेच 1 किलोमीटर अंतरावर मध्यरात्री दाेघांना त्यांनी सोडले. तेथेून ते पसार झालेत. त्यांचा आणि ते ज्या गाडीतून आले त्याचा शोध सुरू आहे असेही पंडीत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT