Keshavrao Bhosale Natyagruha Fire Saam Tv
महाराष्ट्र

Keshavrao Bhosale Natyagruha Fire: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Minister Hasan Mushrif: हे नाट्यगृह जळताना पाहून कोल्हापुरकरांना अश्रू अनावर झाले. अशामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत नाट्यगृहाची पाहणी केली.

Priya More

कोल्हापूरचे ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये हे नाट्यगृह जळून खाक झाले. १०० वर्षांची परंपरा असलेले आणि अजरामर नाटके झालेले हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे नाट्यगृह जळताना पाहून कोल्हापुरकरांना अश्रू अनावर झाले. अशामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे नाट्यगृह नव्याने उभारणार असल्याची ग्वाही कोल्हापुरकरांना दिली.

आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून कोल्हापुरमधील नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह बांधले होते. हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे कोल्हापुरकरांना मोठा धक्का बसला. या नाट्यगृहासंदर्भात कळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर गाठले. आज सकाळी त्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. हे सर्व दृश्य पाहून त्यांना देखील प्रचंड दु:ख झाले.

हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, 'हे नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रात्री मी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून रेल्वेने येत असताना प्रवासातच उशिरा मला ही घटना सोशल मीडियावर समजली. आगीची ती दृश्ये मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती.' तसंच, 'दोन दिवसांतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत- जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू.', अशी ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT