Mahalaxmi Express Fire Saam Tv
महाराष्ट्र

Mahalaxmi Express Fire: महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग, प्रवासी प्रचंड घाबरले; जीव वाचवण्यासाठी धावपळ

Kolhapur-Mumbai Mahalaxmi Express: कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला अचानक आग लागल्या. त्यामुळे प्रवाशांची एकच तारंबळ उडाली. पण काही वेळातच ही आग अटोक्यात करण्यात आली.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री कोल्हापूर ते रुकडीदरम्यान अचानक महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवासी घाबरले. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ झाली. प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आग विझल्यानंतर रात्री साडेदहा नंतर गाडी पुढे नेण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी कोल्हापूरातून रात्री ८.३५ च्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते. यामध्ये अनेक आमदार , खासदार , सेलिब्रिटी यांचा समवेश असतो. आज तर चक्क १५०० हून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते. ट्रेन नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये कोल्हापूरवरून निघाल्यानंतर रुकडीच्या जवळ पोहचताच अचानक सर्वच डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला.

अनेक प्रवाशांना आग लागल्याची शंका येऊ लागली. अगदी काही वेळात एसी ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही माहिती रेल्वे पोलिस सुधीर गिर्हे यांना कळाली. त्यांनी चेन ओढून तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे पोलिसांनी खाली उतरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सर्वांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन रात्री साडेदहानंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT